पुन्हा कधीतरी...
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 6/15/2013 6:40:00 AM
'अखेर आज बातमी आली. साठ्या सोसायटीचा चेअरमन झाला. ह्या सोसायटीसाठी रक्ताचं पाणी केलं पण कुणाला त्याची कदर नाही. आणि केलेलं बोलून दाखवायचा माझा स्वभाव नाही. विचार करता करता मन भूतकाळात गेलं...स्वातंत्र्य मिळाल्यावर मला नेहमी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. एकदा तीनमूर्तीमध्ये गेलो असताना दार बंद, जवाहर कुणालाच आत येऊ देत नव्हता. पटेल, कृपलानी सगळे बाहेर ताटकळत उभे. मी आत गेलो तर जवाहर एकटाच पेशन्स खेळत बसलेला. मी म्हटलं, अरे देश चालवायचा सोडून हे काय? तर म्हटला, मला नाही इंटरेस्ट(...)'
Read full article
द बोर्न अल्टीमेटम आणि लोकशाही
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 6/10/2013 7:13:00 AM
'काही वर्षांपूर्वी 'द बोर्न अल्टीमेटम' बघताना नेहमीप्रमाणे हॉलिवूडने केलेली अतिरंजित कथा असं वाटलं होतं. 'Life imitates art' ही उक्ती इतकी खरी ठरेल असं स्वप्नातही आलं नव्हतं. चित्रपटातील खलनायक सीआयएतर्फे अमेरिकन नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली पकडला जातो. इथेही गंमत बघा, अपराध काय तर अमेरिकन नागरिकांची हत्या. इतर देशातील नागरिक म्हणजे झुरळं, डास, चिलटं. कुणी कितीही चिरडावीत. खुद्द नायक जेसन बोर्नच कितीतरी परदेशी नागरिकांना मारतो तरी तो मात्र हीरो कारण त्याने एकाही अमेरिकन नागर(...)'
Read full article
फर्स्ट कॉन्टॅक्ट
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 6/3/2013 12:41:00 PM
'मागच्या लेखावर इ-मेलमधून आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मुख्यत्वे लेख एकांगी असल्याची तक्रार होती. बदलत्या काळाबरोबर लोकांची आवडही बदलते, मग चित्रपटांचं स्वरूपही बदललं तर बिघडलं कुठे? विचार केल्यावर जाणवलं की या एकांगी टीकेचं मूळ झालेल्या अपेक्षाभंगात होतं. त्यातही चित्रपटात वापरलेले रंग आणि डोळे दिपवणारा भगभगीत प्रकाश यामुळे 'फर्स्ट इंप्रेशन' इतकं वाईट झालं की त्यानंतर त्यात भरच पडत गेली. आणि चित्रपटाच्या पूर्वार्धाचं ९/११ शी साम्य ही शेवटची काडी होती. कलेमध्ये हे बरोबर आणि हे चूक (...)'
Read full article
बेस्ट स्पीड टू रेग्युला वन. कर्क आउट
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 5/27/2013 11:53:00 AM
'मागे आंतरजालावर एक मीम फिरत होती. एक फोटो वापरून चार फ्यान ग्रूपना कसं चिडवायचं? "Use the Force, Harry. ~ Gandalf" आणि चित्र होतं सर पॅट्रीक स्ट्युअर्टचं. स्टार वॉर्स, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, हॅरी पॉटर आणि स्टार ट्रेक हे ते चार फ्यान ग्रुप. मला चारही ग्रुप बेहद्द आवडतात, होम्स टाकलात तर दुधात केशर. या चारांपैकी आता फक्त स्टार ट्रेक आणि स्टार वॉर्स या मालिकांमध्ये काहीतरी नवीन होतं आहे. स्टार ट्रेक मालिकेतील 'इन्टू द डार्कनेस' हा चित्रपट नुकताच पाहिला. या मालिकांचं वैशिष्ट्य असं की (...)'
Read full article
अणूंचा चित्रपट - अ बॉय ऍंड हिज ऍटम
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 5/1/2013 1:10:00 PM
'विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन - यासारखे विषय सामान्य जनतेमध्ये बरेच लोकप्रिय असतात. किंबहुना पुणे-मुंबई आणि मह(...)'
Read full article
तापमानवाढीचा भस्मासुर
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 4/21/2013 7:29:00 AM
''ग्लोबल वॉर्मिंग' हा शब्द ऐकला की बहुतेक लोकांची प्रतिक्रिया 'बस्स, आता पुरे' अशी असते. यात दोष त्यांचा आहे असंही म्हणता येणार नाही. मीडियामध्ये रोज ज्या उलट-सुलट आणि बहुतेक वेळा आक्रस्ताळी स्वरूपाच्या बातम्या येत असतात (याची परमावधी बहुधा तथाकथित 'क्लायमेटगेट'च्या वेळी झाली असावी.) त्यामुळे नेमका प्रश्न काय आहे, त्यामागचे शास्त्रीय, सामाजिक आणि राजकीय घटक कोणते आहेत आणि उपाययोजना करण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत यासारखे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात. या अनुषंगाने नुकतेच मायकेल मॅन य(...)'
Read full article
कार्लसन जिंकला पण चकी झळकला
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 4/2/2013 6:19:00 PM
'कार्लसन - अरे दीवानों, मुझे पहचानो, मै हूं डॉनया वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेमध्ये सध्याचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला कोण आव्हान देणार याचं उत्तर अखेर मिळालं. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नुस कार्लसनने निसटता विजय मिळवला. कार्लसन आणि रशियाचा व्ह्लादिमिर क्रामनिक या दोघांनाही ८.५ गुण मिळाले होते. असं झालं तर काय करायचं याविषयी प्रत्येक स्पर्धेचे नियम वाटेल तसे असू शकतात. इथे कार्लसनला क्रामनिकपेक्षा जास्त(...)'
Read full article
मी दुडदुडले, ऑमनॉमनॉमनॉमनॉम - मिस चिनी आणि माऊभाषा चळवळ
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 3/22/2013 6:51:00 AM
'मागे आम्ही विश्वसुंदरी मिस चिनी यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीनंतर आमच्या कार्यालयात पत्रे, इमेल, एसएमएस आणि फोन यांची सुनामी आली. यापैकी बहुतेक फोन भारत आणि भारताबाहेरील बोक्यांकडून होते असं आमच्या लक्षात आलं कारण फोनवर बरेचदा नुसतं घर्र. . .घर्रर्र. . ऐकू येत असे. (याउलट फोन मांजरीचा असेल तर 'हिस्स्स'.) तेव्हा या लोकाग्रहाला आणि बोकाग्रहाला मान देऊन आम्ही चिनी यांची आणखी एक भेट घ्यायचं ठरवलं.'माझिया बोक्याला आणि मलाही काहीच कळेना' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर चिनी यांची भेट झाली(...)'
Read full article
ये सब क्या हो रहा है, बेटा दुर्योधन?
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 3/16/2013 7:50:00 AM
'अमेरिकन फिजिकल सोसायटी ही संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार यांच्याशी निगडित एक नावाजलेली संस्था आहे. एपीएसचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ते पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी मासिके गेली १०० चालवत आहे. या मासिकांमध्ये अत्युच्च दर्जाचे निबंध प्रकाशित होत असतात, यांत प्रकाशित झालेल्या शोधांना बरेचदा नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. हेच नेचर, एल्सेव्हिअर किंवा अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स (सायन्स मासिक) यांच्याबद्दलही म्हणता येईल. थोडक्यात, विज्ञानासाठी या संस्था आणि क(...)'
Read full article
आपण करायचं का हे?
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 3/13/2013 4:39:00 PM
'पंकजच्या ब्लॉगवरून ही संपूर्ण पोस्ट कॉपी-पेस्ट केलेली आहे:“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं(...)'
Read full article
यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 3/5/2013 6:03:00 AM
'मुराकामी वाचून झपाटून गेल्यानंतर जपानी साहित्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी इतर जपानी लेखकांचा शोध घेणं सुरू झालं. काझुओ इशिगुरो सापडला पण इशिगुरोचा जन्म पूर्वेकडचा असला तरी त्याचं सर्व आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं, शिवाय तो लिहितो इंग्रजी भाषेत आणि बरेचदा त्याच्या लिखाणाचे विषय ब्रिटिश असतात. अर्थात 'ऍन आर्टिस्ट इन अ फ्लोटिंग वर्ल्ड' सारखे युद्धानंतरच्या जपानी समाजाच्या नैतिकतेचा धांडोळा घेणारे अपवाद आहेतच. मग हाती लागला यासुनारी कावाबाटा आणि त्याची अप्रतिम कादंबरी 'द साउंड ऑफ द माउंटन.'कावा(...)'
Read full article
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 2/18/2013 10:45:00 AM
'दाऊद इब्राहीमला चारचौघात कुणी विचारलं की तुम्ही काय करता तर तो काय उत्तर देतो माहीत नाही. आणि प्रश्न विचारणारा उत्तर ऐकण्यासाठी शिल्लक राहतो का ते ही माहीत नाही. पण आपल्याकडचे काही पालक दाऊदलाही त्याच्या प्रोफेशनमध्ये 'स्कोप' आहे का हे विचारायला कमी करणार नाहीत. हे सांगायचं कारण म्हणजे मला हा प्रश्न बरेचदा विचारण्यात येतो. प्रश्न विचारणारे कोण आहेत त्यावर माझं उत्तर बदलतं. पदार्थविज्ञानामध्ये पीएचडी असं उत्तर ऐकलं तर प्रश्नकर्ते जर पालक असतील तर लगेच त्यांचे डोळे लकाकतात. त्यांचं पि(...)'
Read full article
मराठी आंतरजालाचं दुर्दैव
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 2/12/2013 6:50:00 AM
'काल अचानक आमच्या ब्लॉगवर मिसळपाव या सायटीवरून आवक सुरू झाली. शोध घेतल्यावर त्याचा उगम चतुरंग यांचा 'उंटाची चाल तिरकी' हा लेख सापडला. नावावरून लेख बुद्धिबळावर असणार म्हणून उत्सुकतेनं वाचायला घेतला आणि लगेच आम्हाला म्याट्रिक्समध्ये 'ग्लिच' असल्याचं जाणवलं. मागच्या महिन्यात लिहीलेला आनंदच्या डावावरचा लेख आणि हा लेख यात बरंच साम्य आढळलं. कसं ते पहा. निळ्या रंगातील वाक्यं आमच्या लेखातील आहेत आणि लाल चतुरंग यांच्या. (लेखाच्या प्रतिसादांमध्ये आमच्या एका मित्राने ब्लॉगचा दुवा दिल्याचं पाहिल(...)'
Read full article
ही मगरुरी कुठून येते?
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 2/10/2013 6:11:00 AM
'विक्रमाने पुन्हा एकदा वेताळाला खांद्यावर टाकलं आणि तो चालू लागला. हल्ली वेताळाने नियम शिथिल केल्यामुळे विक्रमाला कधीही बोलायची परवानगी होती. रोज वेताळाला फिरवून आणल्यामुळे विक्रमाचा कार्डिओ-वर्काऔट आपोआप व्हायचा आणि एकटाच बडबड न करता गप्पा मारता आल्यामुळे वेताळही खूश असायचा. हल्ली विक्रम दूरवर न जाता झाडाभोवतीच फिरायचा, वर्काऔट मोजणं सोपं व्हायचं. विक्रमाने वेताळाला आयप्याडसुद्धा घेऊन दिलं होतं. दिवसभर सर्फिंग केल्यामुळे हल्ली वेताळ चंद्रमुखी किंवा सूर्यकुमारी यांनी कुणाच्या गळ्यात (...)'
Read full article
इतना सन्नाटा क्यूं है भाई? कोई चेकमेट हो गया क्या?
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 1/26/2013 3:19:00 PM
'नेदरलॅंडच्या वेक आन झीमध्ये 'टाटा स्टील चेस' स्पर्धा गेल्या महिनाभर चालू आहे. यात भारताचे दोन खेळाडू असूनही स्पर्धेबद्दल फारशी उत्सुकता कुठे दिसली नाही. पण ही तक्रार अजिबात नाही बरं का! बुद्धिबळाला चेंडूफळीइतकी लोकप्रियता नाही तेच बरं आहे. कायेना, लोकप्रियता आली की झैरात करणारे येतात. झैरात करणारे आले की पैशे येतात. पैशे आले की राजकारणी येतात आन मंग खेळ जातो का नाय बाराच्या भावात. समजा नाक्यानाक्यावर पोरं बुद्धिबळाचे पट उघडून बसली आहेत असं दृश्य दिसायला लागलं तर लगेच फिडे संघटनेवर '(...)'
Read full article
दोन आयुष्यं
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 1/19/2013 7:17:00 AM
'१९६९ मध्ये उच्च शिक्षणासाठी विक्रम सेठ इंग्लंडला गेला. तेव्हा त्याचं वय १७ वर्षे होतं. त्याला पाठवायला त्याची आई अजिबात तयार नव्हती. आपला मुलगा तिकडे जाऊन बिघडेल की काय अशी तिला भीती वाटत होती. अखेर उपाय निघाला तो विक्रमच्या शांतीकाकांच्या रूपात. शांतीकाका लंडनमध्ये दंतवैद्य होते. त्यांनी 'लोकल गार्डीयन'म्हणून विक्रमवर लक्ष ठेवावं अशी तडजोड निघाली. विक्रम सुरुवातीला त्यांच्यासोबत राहत होता. नंतर त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर तो त्यांच्या वसतिगृहात राहायला गेला. पण तो(...)'
Read full article
ऍरन स्वार्ट्झ
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 1/13/2013 10:55:00 AM
'काल न्यूयॉर्कमध्ये २६ वर्षाच्या ऍरन स्वार्ट्झने आत्महत्या केली. तुमच्यापैकी बरेच लोक आता हे शब्द एखाद्या फीडरीडरद्वारे वाचत असतील. या फीडरीडर (RSS) चा पहिला कोड लिहिण्यात ऍरनचा महत्त्वाचा वाटा होता. कोड लिहिला तेव्हा ऍरन फक्त १४ वर्षांचा होता. नंतरच्या काही वर्षांमध्ये प्रोग्रामिंगच्या जगात ऍरन 'जीनियस' म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर तो बहुचर्चित रेड्डिट या संकेतस्थळाचा सहनिर्माताही होता. अशा प्रकारचा प्रवास आधीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींमध्ये बघायला मिळाला आहे - स्टीव्ह जॉब्ज, झुकरबर्ग(...)'
Read full article
ऍलिस, कृष्णविवर आणि जळत्या भिंतीचे रहस्य
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 12/27/2012 5:00:00 PM
'"There are always... possibilities." Spock, Star Trek II : The Wrath of Khan या वर्षीच्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा विज्ञापीठाच्या जोसेफ पोल्चिन्स्की आणि सहकाऱ्यांनी एक निबंध प्रकाशित केला. निबंधाचा विषय होता कृष्णविवरामध्ये पडल्यावर माणसाचे नक्की काय होते? या निबंधामध्ये मांडलेल्या कल्पनांनी आतापर्यंतच्या कृष्णविवराबाबत असलेल्या समजुतींना छेद दिला. निबंधाचे निष्कर्ष बरोबर आहेत असे गृहीत धरले तर विरोधाभास (Paradox) निर्माण होऊन सामान्य सापेक्षता किंवा पुंजभौतिकी यांच्(...)'
Read full article
नायपॉल, अमर्त्य सेन आणि भारत
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 12/7/2012 1:19:00 PM
'गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवाचे जीवन गौरव पारितोषिक व्ही. एस. नायपॉल यांना देण्यात आले. नंतर गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या भाषणात या निर्णयावर कडाडून टीका केली. या टीकेचा मुख्य मुद्दा नायपॉल यांचे मुसलमानांबद्दलचे लेखन पूर्वग्रहदूषित आहे हा होता. कर्नाड यांनी ज्या पुस्तकांबद्दल ही टीका केली आहे ती पुस्तके म्हणजे 'ऍन एरिया ऑफ डार्कनेस', 'इंडिया : अ वूंडेड सिव्हिलायझेशन' आणि 'इंडिया : अ मिलियन म्युटिनीज नाऊ' ही आहेत. यापैकी एकही पुस्तक वाचलेले नाही (आणि आता वाचवणारही(...)'
Read full article
वी आर लाइक धिस ओन्ली
Author
: Raj
Blog
: Random Thoughts
Date
: 11/27/2012 1:55:00 PM
'हरिका द्रोणावल्ली. हे नाव परिचयाचं नसेल याची १०० % ग्यारंटी. परिचयाचं असायला हरिका काही बिग बॉसमध्ये नाही. हापिसातल्या रिसेप्शनिस्टपासून ते आमचे नवे शेजारी अशी तिची कोणतीही ओळख करून दिली तरी कुणाला काही वाटणार नाही. याउलट कपूर किंवा बच्चन असं नुसतं आडनाव जरी असलं तरी जन्म होण्याच्या आधीपासूनच मिडियावाले मागे लागतात. काय नशीब असतं नं एकेकाचं! बिचाऱ्या हरिकानं आकाश-पाताळ एक केलं (आणि ते केलं आहे) तरीही आराध्या बच्चनला काही न करता जितकी प्रसिद्धी मिळाली आहे त्याच्या एक टक्का प्रसिद्धीह(...)'
Read full article